गेली ४ महिने मी आनंदनगर या झोपडपट्टीत जीवन कौशल्य कार्यक्रम घेण्यासाठी जात आहे. मुलांना मी शाळेच्या अभ्यासाच्या बाहेरच शिकायला मदत करत आहे. मी शिकवत काहीच नाही. मग काय तर मुलांना खेळ,गाणी,गोष्टी,नाटक,चर्चा हि तंत्र वापरून त्यांना त्यांच्या क्षमता ओळखायला मदत करायची एवढचं काम !!!
मागच्या रविवारी यातील १८ मुलांना घेवून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे भेट दिली. मुलांना कानेरी गुहा दाखवल्या. मुलांना त्या गुहाच इतिहास काय आहे.हे जाणून घेण्यात रस नव्हता.फक्त नवीन काहीतरी दादा दाखवतोय.ते आम्ही पाहतोय एवढाच विचार.मग मी ठरवलं नको यांना काही तरी सांगू उगाच bore करण्यापेक्षा त्यांना जे हवं ते करून पाहू.मुलांना फक्त हिंडायचं होत.त्यांना ऊन लागत नव्हत.त्यांना पाण्याची गरज नव्हती.त्यांना भूक पण लागत नव्हती.एवढी उर्जा कुठून आली माहित नाही. पण मला ती पावलो पावली जाणवली.मग एक जन म्हणाला” पाणी हवं थांबू ना थोडं..
मी बर थांबू पण इतक्यात दुसरा कोणीतरी म्हणाला नको दादा आपण शेवटच्या गुहेपर्यंत जायचं मगच थांबायचं.मला जे हव होत ते मिळालं.कोणीतरी सांगतोय कितीही त्रास झाला तर शेवटपर्यत पोहचायचं.आणि सगळे शेवट पर्यत चालत राहिले.आणि मुंबईच्या सर्वोच्य टोकावर बसून जेवणाचा आनंद घेतला.असा कोणीतरी मिळाला जो साऱ्या गटाला श्रमाच महत्व सागून गेल
मी म्हणालो सगळे आले का पहा??.पवन म्हणाला, “नाही दादा आपली शुभांगी मागे राहिली तिला घेवून येतो !”.असा कोणीतरी मिळाला जबाबदारी घेणारा.
मी सागितलं होत सगळ्यांनी मिळून एकत्र फिरायचं.इकडे तिकडे भटकायचं नाही मग विकासाने साऱ्या गटाला एकत्र ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.
आम्ही जेव्हा वाघाची सफारी केली.तेव्हा वर्षा म्हणाली दादा यापेक्षा हि माकड पाहून मज्जा आली.काय ठेवलं त्या वाघात,सिहांत ते तर बंदिस्त आहेत.पण माकड बघ न अशी मुक्त आहेत.अस कोणीतरी मिळालं मला स्वतंत्रच महत्व सांगणार.
अशा कितीतरी गोष्टी मुल मला सांगत होती.ती कुटल्या पुस्तकात वाचून कळणारी नव्हती.ती कुटल्या शाळेच्या चार भिंतीत शिकता येणार नव्हती.ती फक्त अनुभवता येणारी होती.मलाच ती शिकवत होती दादा हे असं करू.एकीकडे शाळेत मूल काही शिकत नाहीत.फक्त दंगा करतात.अभ्यास करत नाही.चांगले मार्क मिळत नाहीत.म्हणून शिक्षक व पालकाची ओरड नेहमी ऐकत असताना.मुलांकडून शिकण्यासारखं भरपूर आहे.फक्त ती संधी पालकांनी व शिक्षकांनी उपलब्ध करून देण मला गरजेच वाटलं.मला वाटत तेच खर शिक्षण जे जीवन जगायला मदत करत !!!
परत भेटू पुढच्या गप्पात …