गोपाल शर्मा इंटरनँशनल स्कूल मध्ये उडाण या संस्थेच्या काही मुलांबरोबर हा एक आठ दिवसाचा उन्हाळी वर्ग झाला. ज्यात की विविध खेळ, ड्रामा, लिखाण, विविध कला, या सारखे वेग-वेगळे उपक्रम पार पडले. पण हा उपक्रम मुख्यत: त्या मुलांचे ध्येय शोधणे, (Dream goals), त्यांच्या मध्ये स्व- सहानुभूतीची भावना, तयार करणे. मुख्यत: या गोष्टी वरती या उपक्रमातून भर दिला गेला होता.
या उपक्रमाची रूपरेखा म्हणजे या सगळ्या उपक्रमासाठी विविध खेळांच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून काही उदिष्ट गाठण्यासाठी पहिल्या दिवशी एक पाया तयार केला. आणि त्या नंतर विविध खेळ, आणि उपक्रमातून मुल स्वत:ला बघून, स्वत:च व्यक्ति चित्र काढायला लागले. जसे की मला हे आवडत, हे आवडत नाही. ठराविक विषयाचा मला अभ्यास करायला आवडत नाही. ही गोष्ट मी खूप छांन करू शकते पण मी कधी करत नाही. आणि त्यांच्यात या प्रश्नावरती चर्चा होऊन, त्यांनीच एकमेकांना हे अडथळे दूर करण्यासाठी सल्ले दिले. या र्यशाळेचा नियम असा होता. की आपण जे ही काही एकमेकांबद्दल बोलू, किंवा त्यांचे प्रश्न ऐकू हे फक्त आपल्यातच राहतील, ते बाहेर कुणी सांगायचे नाहीत. त्या मुळे कदाचित सगळे एका मोकळेपणाने बोलत असावेत.
या नंतर त्यांचे स्वप्न, आणि उदिष्ट या वरती चर्चा झाली. खरतर त्यांची ही स्वप्न त्यांनीच लिहिली, कुणाला डान्सर, क्रिकेटर, शिक्षक ई. व्हायचं होत तर कुणाला सी.आय.डी. मग त्यांच्यातलच कुणीतरी हे बनलं आणि त्या विद्यार्थ्याने त्याची मुलाखत घेतली. प्रत्येक जण स्वत:ला त्या जागी ठेवून बोलत होता, म्हणजे कुणी डॉक्टर होऊन तर कुणी खेळाडू होऊन बोलत होत. त्या वेळी त्यांना बघण्यात एक वेगळीच मजा होती. कारण ते स्वत:ला दहा वर्षा नंतर त्या जागेवर ठेवून बोलत होते, तर काहींना आपला मित्र त्या जागी आहे हे बघून आनंद झाला. त्या नंतर त्यांनी हे आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भविष्यात कोण मदत करू शकेल, काय अडथळा येऊ शकेल या विषयी ते बोलत होते. त्या वेळेस एक अनामिक भीती ही त्यांच्या डोळ्यात दिसत होती, निदान काही लोकांच्या तरी. पण त्यांच्यातला प्रामाणिकपणा खरच शब्दात मांडता न येण्यासारखा होता. काही मुलींनी ही भीती बोलून दाखवली की ते एक मुलगी आहेत त्या मुळे कदाचित त्यांना जास्त शिकता येणार नाही. अजून ही काही लहान भावंड घरात आहेत, त्यांना ही शिकायच आहे.
या सगळ्या नंतर ते एकत्र काम करण्याबद्दल बोलले, आणि एकत्र काम करण किती महत्त्वाच आहे हे त्यांनाच उमजत गेल. साधारण ही सगळीच मुल एक १२ -१३ वयोगटातील होती. पण खरच वय इतक महत्त्वाच नसत अस त्याच्या कडे बघून वाटायला लागलं.
या सगळ्यातून मी ही खूप शिकले, काही बाबतीत तिथल्या काही प्रशासनामुळे अडथळे आले, त्या मुळे थोडासा अपेक्षा भंग झाला. पण या सगळ्याच मुलां सोबत फार लवकर एक bond जुळला होता. इतक्या अल्पावधीत तो जुळेल अस कधीच वाटलं नव्हत, आणि ही सगळीच मुल म्हणजे एक स्वत:च अस ऊर्जा स्त्रोत होती आणि तितकीच प्रामाणिक आणि प्रेमळ देखील.
निकिता थुरुवल (सहायक, अपनी शाळा)
शब्दांकन- रामेश्वर जिरवणकर.
अपनी शाळा फक्त एक सुरेख संस्था नाही, एक सुरेख कल्पना सुद्धा आहे. खूप अभिनन्दन.
LikeLike